Poetry: शाळा हेच मंदिर
नया सवेरा नेटवर्क
शाळा हेच मंदिर
शाळा हेच मंदिर माझे , देव मुले मुली,
शिक्षकांनी व्हावे त्यांची , कल्पवृक्षाची साऊली llधृ ll
पेटवून त्यांच्या साठी , ज्ञानदीप ज्योती ,
शिकवुनिया शांत होई , भूक या मनाची ,
सदा स्मित हास्य त्यांचे, मना वेड लावी ll१ll
निरागस कोमल काया , मनी नसे द्वेश,
उॅच - नीच त्यांच्यासाठी , कुणी नसे येथ,
अमृताहुनी गोड , असे त्यांची बोली ll२ll
नभाहुनी मोठी आशा , त्यांना शिकण्याची ,
ज्ञानरूपी पंखाने हे , आसमंत भेदण्याची,
शिक्षकच आहे त्यांच्या, भविष्याचा वाली ll३ll
सदा वाहतो मी त्यांचा , भार माझ्या डोई ,
तेच माझे पांडुरंग , तेची रखुमाई ,
शाळेलाही मंदिर बनवी , अशी त्यांची नवलाई ll४ll
श्री ज्ञानेश्वर एम.कव्हर (शिक्षक)
बृहन्मुंबई महानगर पालिका
![]() |
विज्ञापन |